Hijab Controversy : हिजाब किंवा बिकिनी घालण्याचा महिलांचा अधिकार - प्रियांका गांधी
Hijab Controversy : कर्नाटकामधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुस्लिम मुलींना हिजाब परिधान (Hijab Row) करण्यावरुन वाद उफाळला आहे. हा वाद देशात पसरत आहे. आता या वादात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनीही उडी घेतली आहे.
नवी दिल्ली : Hijab Controversy : कर्नाटकामधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुस्लिम मुलींना हिजाब परिधान (Hijab Row) करण्यावरुन वाद उफाळला आहे. हा वाद देशात पसरत आहे. आता या वादात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनीही उडी घेतली असून त्यांनी काय परिधान करायचे आहे, हा महिलांचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. (Priyanka Gandhi jumped into Hijab Controversy, said- Women's right to wear Hijab or Bikini)
महाराष्ट्रात पडसाद, मुस्कानला 5 लाखांचे बक्षीस
काय घालावे हा महिलांचा अधिकार : प्रियांका
प्रियंका गांधी यांनी ट्विट करून हिजाब वादावर आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, 'मग ते बिकिनी असो, बुरखा असो, जीन्स असो किंवा हिजाब असो. महिलांनी काय परिधान करायचे आणि काय घालायचे आहे, ते निवडण्याचा त्यांचा (महिलांचा) अधिकार आहे.
प्रियांका गांधी यांनी पुढे लिहिले की, 'महिलांना हा अधिकार संविधानाने दिला आहे. महिलांची छेडछाड थांबली पाहिजे. यासोबतच मी मुली आहे, ती लढू शकते, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यावर राहुल गांधी यांनीही प्रियांकाचे समर्थन करत तिच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली.
कमल हसन यांनीचेही ट्विट
मक्कल नीधी मय्यमचे (Makkal Needhi Maiam) अध्यक्ष अभिनेते-राजकारणी कमल हसन यांनीही हिजाबच्या वादावर ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की, 'शेजारच्या कर्नाटक राज्यात जे घडत आहे ते तामिळनाडूमध्ये होऊ नये. अशावेळी राज्यातील पुरोगामी शक्तींनी अधिक सावध राहायला हवे.
उच्च न्यायालयात सुनावणी होणार
कर्नाटकातील उडुपी येथील हिजाब वादावर आज उच्च न्यायालयात (High Court) सुनावणी होणार आहे. हा वाद इतका वाढला आहे की, राज्यातील शाळा, महाविद्यालये तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश द्यावे लागले. आता मध्य प्रदेश सरकारही शाळांमध्ये ड्रेस कोड लागू करण्याच्या तयारीत आहे.
हिजाब वादात मलाला युसुफझाईचे ट्विट
मलाला युसुफझाई हिनेही हिजाब वादाबाबत ट्विट केले आहे. मलालाने तिच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुलींना हिजाब परिधान करून शाळेत जाण्यापासून रोखणे हे भीतीदायक आहे. पाकिस्तानातूनही हिजाबच्या वादावर मोठ्या प्रमाणात ट्विट केले जात आहेत.