नवी दिल्ली : जे भाजपचे वैशिष्ट्य आहे. ते त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवले आहे. भाजपकडून जो व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. तो एडिट करण्यात आला आहे. मी लहान मुलांना अशा घोषणा देऊ नका, असे सांगत रोखले. तोच भाग काढून टाकण्यात आला आहे. ते खरं आहे. मी जे करते ते खोटे नसते ते सत्यच असते. मी पंतप्रधान यांच्याबाबत अशा घोषणा देणे योग्य नाही, असे म्हटले. मात्र, तोच भाग काढून टाकण्यात आला, हेच भाजपचे राजकारण आहे, असे जोरदार प्रत्युत्तर काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी देत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना टोला लगावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सभ्य कुटुंबातील लोकांनी त्यांच्या मुलांना प्रियंका गांधींपासून दूर ठेवले पाहिजे, असे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटले होते. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांच्यावर इराणी यांनी टीका केली होती. प्रियंका यांचा एक व्हिडीओ स्मृती इराणी यांनी ट्विट केला होता. काही मुले पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह शब्दात घोषणा देत होती. त्यावरुन त्यांनी प्रियंका गांधी यांच्यावर टीका केली होती. मात्र, प्रियंका गांधी यांनी स्मृती इराणी यांना तसेच उत्तर दिले आहे. जे भाजपचे वैशिष्ट्य आहे. ते त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवले आहे. त्यांनी माझा व्हिडिओ संपादित केला आहे. मी प्रत्यक्षात मुलांना आपल्या पंतप्रधानांबाबत अशा घोषणा देणे योग्य नाही, असे सांगत थांबविले. तुम्ही मुले चांगली आहात, असे म्हटल्यानंतर त्यांनी राहुल गांधी झिंदाबाद म्हटले.



लोकसभा निवडणुकीचे ४ टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता देशात पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचार सुरु आहे. ६ मे ला अनेक महत्त्वाच्या मतदारसंघात मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशच्या अमेठी मतदारसंघातही मतदान होणार आहे. येथून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मैदानात आहेत. राहुल गांधी यांच्यासाठी प्रियंका गांधी या प्रचार करत आहेत.