नवी दिल्ली : प्रियांका गांधी यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. गेले अनेक वर्षे याची मागणी केली जात होती. यासाठी प्रयत्न देखील केले जात होते. त्यांना पक्षाचे महासचिव बनवण्यात आले असून उत्तर प्रदेश (पूर्व)ची जबाबदारी देण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेश (पश्चिम) ची जबाबदारी ज्योतिरादित्य सिंधिया यांना देण्यात आली आहे. याशिवाय केसी वेणुगोपाल यांना महासचिव बनवण्यात आले आहे. निवडणूकीआधी प्रियांका गांधी यांना देण्यात आलेली मोठी जबाबदारी आहे. उत्तर प्रदेशमध्ये खूप मोठा चमत्कार करत ठोस पाऊले उचलण्याचा दावा काही दिवसांपूर्वीच पार्टी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. उत्तर प्रदेशला कॉंग्रेस खूप मोठे सरप्राईज देईल असेही त्यांनी म्हटले होते. त्यानुसार हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. प्रियांका यांच्या नियुक्तीनंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियांका यांनी सक्रिय राजकारणात याव अशी आम्हा कार्यकर्ते, नेत्यांची खूप वर्षांपासूनची मागणी होती. पण हा निर्णय त्यांचा स्वत:चा असेल असे सोनिया गांधी यांनी सांगितले होते. कॉंग्रेस अध्यक्ष योग्य ती जबाबदारी प्रियांकाजींना देतील आणि कॉंग्रेसमध्ये उत्साह पाहायला मिळेल अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी झी 24 तासला सांगितले.



तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील प्रियांका यांना शुभेच्छा दिल्या. 



प्रियांका यांना उत्तर प्रदेशची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. याचा प्रभाव इतर राज्यांवरही दिसेल असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोहरा यांनी सांगितले. पार्टीने ज्योतिरादित्य सिंधिया यांना महासचिव बनवत उत्त


आता प्रियांका यांची उत्तर प्रदेशच्या महासचिव पदाची जबाबदारी मिळाली आहे. 2017 मध्ये त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून देखील पाहिले जाऊ शकते असे ट्वीट पत्रकार बरखा दत्त यांनी केले आहे. 




हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी देखील ट्वीट करुन प्रियांका गांधी यांना नव्या जबाबदारीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


 प्रियांका गांधी यांना राजकारणात आणणे हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. पण त्या राजकारणात आल्याने राजकारणात फारसा फरक पडणार नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते अनंत गिते यांनी दिली आहे.