Women Playing Kabaddi In Saree: एक थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान वायरल (Viral) होत आहे, त्या  व्हिडिओने लोकांची मनं जिंकली आहेत. व्हिडिओमध्ये साडी नेसलेल्या महिला अतिशय मनोरंजक पद्धतीने कबड्डी (Kabaddi) खेळताना दिसत आहेत. महिलांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड (Trend) होत आहे. व्हिडिओ पाहून युजर्स महिलांचे कौतुक करत आहेत. तुम्हाला माहितेय का, हा व्हिडिओ छत्तीसगड ऑलिंपिक (Women's Kabaddi in Chhattisgarhia Olympics) चा आहे, ज्यामध्ये साडी नेसलेल्या महिला कबड्डी खेळताना दिसत आहेत. (Pro Kabaddi fails in front of women who play kabaddi wearing sari viral video nz)


आणखी वाचा - रश्मिका मंदान्ना मालदीवमध्ये या अभिनेत्यासोबत रोमँटिक सुट्टीवर? चाहत्यांकडून खूलासा


 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेषत: व्हायरल होत असलेल्या कबड्डी सामन्याचा हा व्हिडिओ छत्तीसगड ऑलिम्पिकचा (Chhattisgarh Olympics) आहे, ज्याचे उद्घाटन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल (CM Bhupendra Baghel) यांनी 6 ऑक्टोबर 2022 रोजी केले होते. व्हिडिओमध्ये साडी नेसलेल्या महिला कबड्डी खेळताना आणि मोठ्या उत्साहात एकमेकांना आव्हान देताना दिसत आहेत. हा खेळ 6 ऑक्टोबर ते 6 जानेवारी 2023 या कालावधीत आयोजित केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


आणखी वाचा - Relationship Tips: हेच 'ते' संकेत आहेत जेव्हा तुम्हाला कळेल की तुमचा पार्टनर करत आहे तुमचा वापर


 



भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी अवनीश शरण (Awanish Sharan) यांनी त्यांच्या ट्विटर (Twitter) हँडलवरून हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये (Caption) लिहिले आहे, 'आम्ही कोणापेक्षा कमी आहोत!!! छत्तीसगढिया ऑलिम्पिकमधील महिला कबड्डी. हा व्हिडिओ पाहिला जात आहे आणि खूप पसंत केला जात आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 13 हजारांहून अधिक लोकांनी लाईक (Like) केले आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर लवकरच पाहून घ्यावा.