Big News : Most Wanted खलिस्तानी दहशतवाद्याला अटक; दिल्ली विमानतळावर NIA कडून चित्तथरारक कारवाई
Pro khalistan terrorist kulwinderjeet singh arrested : NIA कडून एक मोठी कारवाई करत खलिस्तानी दहशतवाद्याला (Khalistani terrrorist) अटक करण्यात आली आहे.
Pro khalistan terrorist kulwinderjeet singh arrested : NIA कडून एक मोठी कारवाई करत खलिस्तानी दहशतवाद्याला (Khalistani terrrorist) अटक करण्यात आली आहे. सोमवारी राष्ट्रीय तपास यंत्रणांनी चित्तथरारक कारवाई करत या दहशतवाद्याला ताब्यात घेतलं. खलिस्तानी दहशतवादी कुलविंदरजीत सिंग उर्फ खानपुरिया याला दिल्ली विमातळावर (Delhi Airport) अटक झाली. त्याच्या नावे तब्बल 5 लाख रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. खालसा (Khalsa) दहशतवादी संघटनांशी संलग्न असणाऱ्या खानपुरियानं आतापर्यंत बऱ्याच कुरापतींमध्ये सहभाग घेतल्याचं म्हटलं जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार खानपुरिया (khanpuriya) बब्बर खालसा इंटरनॅशनल (babbar khalsa international) आणि खालिस्तान लिबरेशन फोर्स (khalistan liberation force) यांसारख्या दहशतवादी संघटनांशी जोडला गेला आहे. देशात बऱ्याच दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा हात असल्याचं कळत आहे. NIA च्या माहितीनुसार कुलविंदरजीत पंजाबच्या टार्गेट किलिंगमध्येही सहभागी होता. इतकंच नव्हे, तर दिल्लीतील कनॉट प्लेस येथे झालेल्या बॉम्बस्फोटासह (Bomb blast), इतर राज्यांमध्ये झालेल्या ग्रेनेड हल्ल्यातही त्याचं नाव पुढे आलं होतं.
2019 पासून कुलविंदरजीत फरार
2019 पासून खानपुरिया फरार होता. एनआयएच्या Most Wanted यादीतही त्याच्या नावाचा समावेश होता. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार त्यानं देशातून पलायन केलं होतं. सध्या तो बँकॉकहून भारतात आला होता. 18 नोव्हेंबरला बँकॉकहून (Bankok) आलेल्या एका विमानात तो असल्याची माहिती मिळाली आणि तो दिल्ली विमानतळावर येताच एनआयएनं (NIA) तडक कावाई करत त्याला अटक केली.
वाचा : भाजपला सळो की पळो करणाऱ्या तरूण फायर ब्रँड नेत्यामुंळे काँग्रेस 'गॅसवर'!
तपासातून धक्कादायक माहिती समोर
एनआयएनं जारी केलेल्या पत्रकामध्ये खानपुरियाला अटक करण्यापासून ते तपासापर्यंतची माहिती उघड करण्यात आली आहे. यामध्ये देशांतर्गत दहशतवादी कारवायांमध्ये कुरविंदरजीतचा मोठा हात होता. शिवाय Bhakra Beas Managment Board च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निशाण्यावर घेत पंजाब (Punjab) आणि देशात दहशतवाद पसरवण्याचा हेतू तो साध्य करु पाहत होता.