भाजपला सळो की पळो करणाऱ्या तरूण फायर ब्रँड नेत्यामुंळे काँग्रेस 'गॅसवर'!

तीन तरुण आणि गुजरातमधील राजकारण....

पोपट पिटेकर | Updated: Nov 21, 2022, 11:20 PM IST
भाजपला सळो की पळो करणाऱ्या तरूण फायर ब्रँड नेत्यामुंळे काँग्रेस 'गॅसवर'! title=

पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : गुजरातमधील विधानसभा (Gujarat Assembly Elections) निवडणुकीचा प्रचार रोज जोर धरत आहे. पंतप्रधान मोदीही (Prime Minister Modi) पोहोचल्यामुळे गुजरातमधील निवडणूकीत रंगत येणार आहे. मोदी हे रॅलीच्या (Modi rally) माध्यमातून मतदारांना भाजपच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीची 2017 चा निकाल पाहिल्यानंतर अनेक गोष्टी लक्षात येईल. ज्यामध्ये कॉंग्रेसने (Gungress Gujarat Election) चांगली कामगिरी करून भाजपला हानी पोहोचवली होती. यंदा तीन तरुण चेहरे काँग्रेसच्या बाजूने प्रचार करताना दिसले, ज्यामुळे पक्षाच्या जागा वाढल्या. मात्र या तिन्ही नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे गुजरातमध्ये काँग्रेस गॅसवर असल्याचं पाहायला मिळत आहे. 

भाजप 2017च्या निवडणूकीत अडचणीत 
गुजरात विधानसभा निवडणुक (Gujarat Assembly Elections) 2017 च्या  हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी (Hardik Patel, Alpesh Thakor, Jignesh Mevani) यांनी भारतीय जनता पक्षाला (Bharatiya Janata Party) चांगलचं अडचणीत आणले होते. हार्दिक पटेलबद्दल (Hardik Patel) बोलताना त्यांनी पाटीदार आंदोलनाचे (Patidar movement) नेतृत्व केले. दुसरीकडे इतर मागासवर्गीयांना म्हणजे ओबीसी (OBC) यांना एकत्र करण्याचे काम अल्पेश ठाकोर (Alpesh Thakor) यांनी केले. जिग्नेश मेवाणीबद्दल (Jignesh Mevani) बोलायचे झाले तर ते दलित समाजाचे नेते आहेत. सध्याची परिस्थिती पाहिल्यास गेल्या निवडणुकीत काँग्रेससोबत दिसणारे हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर भाजपच्या तिकिटावर निवडणूक (Election on BJP ticket) लढवत आहेत. दुसरीकडे, गेल्या वेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले मेवाणी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक (Election on Mevani Congress ticket) लढवताना दिसणार आहेत.
 
जिग्नेश मेवाणी
गुजरातचे फायरब्रँड दलित नेते जिग्नेश मेवाणी (Gujarat firebrand Dalit leader Jignesh Mevani) वडगाममधून विजयी झाले होते. जिग्नेश मेवाणी गेल्या वेळी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून विजयी झाले होते. मात्र, यावेळी जिग्नेश मेवाणी (Jignesh Mevani) यांना वडगाममधून (Vadgam) विजय मिळवणे सोपे नाही.

हार्दिक पटेल
गुजरातमधील विरमगाम मतदारसंघातून भाजपने हार्दिक पटेल (BJP Hardik Patel from Viramgam Constituency) यांना उमेदवारी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये हार्दिक पटेल (Hardik Patel) दाखल झाले आहेत. सर्वांना सोबत घेऊन विरमगाममधून विजय (Victory from the deadlock) मिळवण्याचा प्रयत असल्याचं हार्दिक पटेलाचं दिसून येतयं.

अल्पेश ठाकोर
गांधीनगर दक्षिणमधून भाजपने अल्पेश ठाकोर (BJP Alpesh Thakor from Gandhinagar South) यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी गांधीनगर दक्षिणमधून उमेदवारी अर्ज दाखल (Filing of candidature application) केला आहे. नामांकनापूर्वी ठाकोर यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत (Gujarat Assembly Elections) भाजप 150 हून अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा केला आहे.