मुंबई : प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात असं यश मिळवायचं असतं जेणेकरून त्याचं नाव सर्वत्र असेल. त्याचबरोबर अनेकांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या यशाची गाथा पोहोचवायची असते. मात्र त्यासाठी कठोर परिश्रमही करावे लागतात. तर आज आम्ही तुम्हाला कृष्णा चौधरी उर्फ ​​केसी कम्पलीट फाइटर या व्यक्तीची सक्सेस स्टोरी सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कृष्णा जो वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर आणि इंटरनॅशनल बॉडी ट्रांसफॉर्मेशन स्पेशलिस्ट आहे. नुकतंच त्याने आपले 5 हजार बॉडी ट्रांसफॉर्मेशन पूर्ण केलं आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकंही जिंकली आहेत. 


वडील चालवतात दुकान


कृष्णा चौधरी याचा जन्म 18 मार्च 2000 रोजी जयपूरमध्ये झालाय. त्याचे वडील निहालसिंग चौधरी हे दुकान चालवतात. घरात आई-वडिलांशिवाय एक मोठी बहीण आणि एक लहान भाऊ आहे. लहान भाऊ पवन चौधरी हा देखील फिटनेस ट्रेनर आहे.


मोठ्या भावाच्या मृत्युने बदललं आयुष्य


कृष्णा सांगतो की, तो सहावीत वर्गात असताना त्याच्या मोठ्या भावाचा अपघातात मृत्यू झाला होता. तो खूप चांगला पैलवान होता. आई-वडिलांना मोठ्या मुलाची कमतरता भासू नये म्हणून कृष्णा चौधरी यांनी खेळात काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. याद्वारे मोठ्या भावाची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला. 


अभ्यासाबरोबरच आपला खेळ महत्त्वाचा समजून त्याने या दोन्हीत आपलं पूर्ण योगदान दिलं. कृष्णाच्या मते, त्याच्या यशामागे त्याचे आई-वडील आणि गुरु यांचे मोठे योगदान आहे.


मार्शल आर्ट्समध्ये तीन वेळा जागतिक विक्रम:


कृष्णा चौधरी याने मार्शल आर्ट्स क्षेत्रात 3 वेळा विश्वविक्रम केला आहे. त्याने 2017 मध्ये एक आणि 2020 मध्ये दोन विश्वविक्रम केलाय. त्याचा KC कम्प्लीट फायटर प्रमाणित क्रीडा पोषणतज्ञ आहे आणि तो जगभरातील हजारो लोकांना प्रशिक्षण देतो. तो एक डिजिटल उद्योजक तसेच KC Complete Fitness चे संस्थापक आहे. मार्शल आर्ट आणि सेल्फ डिफेंससाठी पारंगत असलेल्या कृष्णा चौधरी विविध स्तरांवर मुलींसाठी मोफत स्वसंरक्षण कार्यशाळाही आयोजित करतात.