...तर वडील झाल्यास मिळणार तीन महिन्यांची सुट्टी
बाळाचा जन्म झाल्यावर त्याच्या संगोपनाबाबत वडिलांची भूमिका सुनिश्चित करण्यासाठी एक महत्वाचा प्रस्ताव समोर आला आहे. या प्रस्तावात सर्वच क्षेत्रात काम करणा-या कर्मचा-यांना तीन महिन्यांची सुट्टी देण्याबाबत सूचना करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : बाळाचा जन्म झाल्यावर त्याच्या संगोपनाबाबत वडिलांची भूमिका सुनिश्चित करण्यासाठी एक महत्वाचा प्रस्ताव समोर आला आहे. या प्रस्तावात सर्वच क्षेत्रात काम करणा-या कर्मचा-यांना तीन महिन्यांची सुट्टी देण्याबाबत सूचना करण्यात आली आहे.
पितृत्व लाभ विधेयक २०१७ यावर संसदेच्या पुढील सत्रात विचार केला जाऊ शकतो. बाळाचा जन्म होत असताना आई-वडिल दोघांनाही समान फायदा दिला जावा, यावर या प्रस्तावात जोर देण्यात आला आहे.
कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी हा प्रस्ताव मांडला आहे. बाळाचं संगोपन ही आई-वडील दोघांची संयुक्त जबाबदारी आहे. बाळाची काळजी घेण्यासाठी दोघांनाही वेळ मिळायला हवा, असं त्यांचं मत आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास याचा सर्वच क्षेत्रातील ३२ कोटी लोकांना फायदा होणार आहे.