Propose Day 2023: फेब्रुवारीचा (February) महिना 'लवबर्ड्स'साठी फारच खास असतो. प्रेम व्यक्त करण्याचा हा महिना काहींसाठी खुशखबर घेऊन येतो, तर अनेकांसाठी निराशा... या महिन्यात काही प्रेमीयुगुल (love couple) पहायला मिळतात. तर काही कबीर सिंग... व्हॅलेंटाईन वीकच्या (Valentines Week) आठवड्याच अनेकांसाठी महत्त्वाचा ठरतो तो प्रपोज डे (Propose Day 2023). या दिवशी 'आर या पार'ची लढाई असले. प्रेमयुद्धच म्हणावं ते...  'प्रपोज डे'ला प्रेम व्यक्त करण्याची भीती वाटते. त्यामुळे काहीजण प्रेम व्यक्त करताना कच खातात. त्यामुळे जाणून घ्या प्रेम व्यक्त करण्याच्या भन्नाट (Creative ideas) आणि बेस्ट आयडिया.


1. कँडल लाईट डिनरचा प्लान करा (candle light dinner)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला जर हा दिवस आनंदात साजरा करण्याची इच्छा असेल त रतुम्ही त्यांना कॅन्डल लाईट डिनरसाठी घेऊन जाऊ शकता. रेस्टॉरंटमध्ये आज खास सुविधा देखील केलेल्या असतात. त्यामुळे तुमचा दिवस आनंदात जाईल. त्याशिवाय घरीही खास डिनरची योजना तयार करू शकता. चंद्र अधिक चांगला दिसेल अशी जागा निवडा. ती जागा तुम्ही मेणबत्त्या, गुलाब, चॉकलेट इत्यादींनी सजवू शकता. त्यामुळे वातावरण देखील रोमाँटिक होईल.


2. फिल्मी स्टाईल प्रपोज करा (film style proposal)


काही म्हटलं ना भावा... पोरींना पिच्चरची लय क्रेझ असते. त्यामुळे एखाद्या मुलाने आपल्याला फिल्मी स्टाईल प्रपोज केलं तर त्यांना आवडतंच. पण आधी नकार पचवण्याची तयारी ठेऊन बोलायला जा. फेरीस व्हील स्विंगवर बसून तुम्ही तुमच्या प्रेमाने तुमच्या भावना व्यक्त करू शकता. तुमच्या पार्टनरला तुमचे मन सांगण्यासाठी तुम्ही ही पद्धत अवलंबू शकता.


3. मूव्ही आणि डेटला जा (movies and date)


प्रेम व्यक्त करण्याआधी तुम्ही मुव्हीला जाणं हा देखील चांगला पर्याय असू शकतो. यासाठी तुम्ही त्यांच्यासोबत रोमँटिक चित्रपट पाहू शकता. त्यानंतर तुम्ही आपलं प्रेम व्यक्त करू शकता. जर तुम्हाच्या मनात 19-20 असेल तर हा पर्याय कामी ठरतो.


आणखी वाचा - Rose Day च्या दिवशी जाणून घ्या वेगवेगळ्या रंगांच्या गुलाबांचा अर्थ; नाहीतर पहिल्याच दिवशी पश्चाताप होईल!


4. क्विलिटी टाईम घालवा (quality time)


प्रेम व्यक्त करण्यासाठी दोघांच्या मनातील गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. ज्यामुळे तुम्ही डायरेक्ट प्रपोज केलं तर नाकार येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे वेळ द्या आणि गप्पा मारा, क्विलिटी टाईम स्पेंड करा, त्यानंतर प्रपोज करू शकता.


दरम्यान, प्रेम निस्वार्थ असावं. माणसाची सगळी धडपड या उत्कटतेसाठीच आहे. मग ती उत्कट गरज कशाचीही असू शकते. ती कधी भुकेची असेल तर कधी शरीराची, आणि कधी मनाचीही. कधी विचार केला आहे का? प्रेमात उत्कटता नसेल तर पूर्णत्वाची भावना कशी येईल? तुमचं प्रेम कसंय आधीच ठरवून घ्या.