Viral Video : जगभरात सीमा हैदरची (Seema Haider) ऑनलाइन गेम लव्ह स्टोरी ट्रेंडिंगमध्ये असतानाच एका 14 वर्षींय मुलाच्या भयानक व्हिडीओ समोर आला आहे. अचानक फायर फायर असं तो ओरडतो...अंग थरथरतं त्याला दिव्यांग संस्थेच्या वसतिगृहात एका खोलीत डांबून ठेवण्याची वेळ पालकांवर आली आहे. (pubg fire free online game addiction 14 year old boy lost mental balance viral video on Internet trending news on google today )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना काळात मुलांच्या हातात मोबाईल आले. त्यानंतर ऑनलाइन अभ्यासासोबत मुलांना ऑनलाइन फायर फ्री आणि PUBG सारख्या गेमचे व्यसन लागले. त्यामुळे या 14 वर्षींय मुलाचे मानसिक संतुलन बिघडलं. ही धक्कादायक घटना राजस्थानमधील अलवरचे आहे. हा मुलगी सातवीत असून गेल्या सात महिन्यांपासून त्याला मोबाईलवर ऑनलाइन खेळाचं व्यसन लागलं होतं. 


या मुलाचे आई सफाई कामगार आणि वडील रिक्षा चालक आहेत. त्यामुळे ते सकाळीच कामासाठी घरातून निघून जायाचे. अशावेळी मुलगा घरात एकटाच असायचा. सात महिन्यांपूर्वी वडिलांनी त्याला अँड्रॉइड मोबाईल फोन घेऊन दिला. मुलाशी संपर्क करता यावा म्हणून त्यांनी त्याला मोबाईल दिला खरा पण त्याने या मोबाईलचा दुरुपयोग केला. शिक्षणासाठी मोबाईलचा उपयोग होईल पण हा मुलगा शिक्षणापासूनच वंचित झाला. 


तो मुलगा 15 तासांपेक्षा जास्त वेळ अभ्यास सोडून मोबाईलवर गेम खेळत बसायचा. अगदी रात्रीच्या वेळी रजाई किंवा चादरच्या हात तो मोबाईलवर गेम खेळत होता. त्याला ऑनलाइन गेमचं एवढं वेड लागलं होतं की तो तहानभूक विसरला होता. तासंतास तो फक्त मोबाईलवर गेम खेळायचा अगदी या गेममुळे त्याने आपल्या जीव पणाला लावला होता. सतत त्याचा हातात मोबाईल असायचा. 


जेव्हा त्याचा मोठ्या बहिणीने आई वडिलांना हा प्रकार सांगितला त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते वैतागले आणि त्यांनी त्या मुलाला चांगलाच समज दिला. त्याला फोन देणं बंद करण्यात आलं पण त्याचा जिद्दीपुढे आई वडील हताश झाले. घरात फ्री वायफाय असल्याने तो सतत मोबाईलवर गेम खेळत बसायचा. 


घरातले त्याला सतत ओराडायचे मोबाईलला हात लावला तर तुझी खैर नाही. पण तो मुलगा इतक्या वेडा झाला होता की, एक दिवस घरचे ओरडले म्हणून तो घर सोडूनही पळला होता. तो रागाच्या भरात एकदा नाही तर दोन वेळा घरातून निघून गेला होता. अखेर त्याला घरात दोन महिने बांधून ठेवण्याची वेळ पालकांवर आली. 



पण त्याचं शरीर थरथर होतं, तो अचानक फायर फायर ओडायचा...त्याची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत होती. अखेर त्याचा पालकांना त्याला जयपूर रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. आता त्याचावर अलवरच्या स्कीम क्रमांक 8 मधील वसतिगृहात ठेवण्यात आलं आहे.



जिथे त्यावर समुपदेशकद्वारे उपचार करण्यात येतं आहे. अनेक डॉक्टर झाले, विशेष समुपदेशक झाले पण त्याचा काही उपयोग होत नाही आहे. आता एका विशेष समुपदेशकाच्या मदतीने त्यांच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती सुधारतेय.