नवी दिल्ली : सरकारी बँका आता ग्राहकांच्या दारापर्यंत त्यांना सुविधा पोहचवणार आहेत. अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी पब्लिक सेक्टर बँकांसाठी डोअर स्टेप बँकिंग सेवा  (door step banking services)लॉन्च केली आहे. अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्यासाठी बँकांची भूमिका महत्त्वाची असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यावेळी बोलताना सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घर बसल्या घेता येणार बँकिंग सुविधांचा फायदा -


2018 मध्ये वित्त सेवा विभागाने सुरु केलेल्या ईएएसई EASE (enhanced access and service excellence)सुधारणांचा हा भाग आहे. वित्त सेवा विभागाचे सचिव डेबाशीष पांडा यांनी, ही सेवा सुरु झाल्यानंतर ग्राहक आता घर बसल्या बँकिंग सुविधांचा फायदा घेऊ शकत असल्याचं, सांगितलं.


डोअर स्टेप बँकिंग सर्व्हिसचं उद्घाटन करताना, अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, बँकांना त्यांच्या व्यवसायावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, तसंच ज्या ठिकाणी बँका अद्यापही पोहचलेल्या नाहीत, अशा ठिकाणी बँकांनी पोहचण्याची गरज आहे. बँकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला, सरकारच्या सर्व योजनांची संपूर्ण माहिती असली पाहिजे. या डोअर स्टेप बँकिंगचा पाया काही वर्षांपूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने रचला होता. 


डोअर स्टेप बँकिंगची सुविधा सर्वप्रथम केवळ ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी देण्यात येणार होती. कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव पाहता रिझर्व्ह बँकेने आदेश दिला होता की, 70 वर्ष आणि त्याहून अधिक वयवर्ष असणाऱ्या आणि दिव्यांगांना डोअर स्टेप बँकिंग सुविधा दिली गेली पाहिजे. 


परंतु आता ही सुविधा सर्वांसाठीच असल्याचं सांगण्यात आलं आहे. याचा वापर पब्लिक सेक्टर बँकेचे ग्राहक वेब पोर्टल, मोबाईल ऍप आणि कॉल सेंटरद्वारे करु शकतात. ही सुविधा देशभरात जवळपास 100 सेंटर्सच्या एजेंटद्वारे पोहचवली जाणार आहे. डोअर स्टेप बँकिंगची सुविधा पुढच्या महिन्यापासून म्हणजेच ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. पब्लिक सेक्टर बँकांच्या ग्राहकांना डोअर स्टेप सुविधेसाठी काही शुल्क भरावे लागणार आहे.