Guinness World Records: सारीपाट अर्थात बुद्धीबळाचा (Chess) खेळ हा सर्वात जिनीयस खेळ समजला जातो. म्हणूनच तर म्हणतात... ना शतरंज का खेल सब के बस का खेल नही.... मात्र, पद्दुचेरी येथील लहान मुलीने बुद्धीबळाचा डाव न खेळता अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पद्दुचेरीच्या ओडेलिया जास्मिनने  (S. Odelia Jasmine) अनोखा विक्रम रचला आहे. जास्मिनने सर्वात फास्ट बुद्धिबळच्या सेटची व्यवस्था केली आहे. सर्व सोंगट्या या मुलीने अवघ्या 29.85 सेकंदात चेसबोर्डवर मांडल्या आहेत. तिच्या या अनोख्या विक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (GWR) मध्ये नोंद झाली आहे.


सर्वात कमी वेळात सर्व सोंगट्या बुद्धीबळाच्या पटावर मांडण्याचा विक्रम  अमेरिकेच्या डेव्हिड रशच्या नावावर होता. डेव्हिसने ही कामगिरी करण्यासाठी 30.31 सेकंदांचा वेळ घेतला होता. डेव्हिडचा विक्रम ओडेलिया जास्मिनने मोडला आहे. ओडेलिया जास्मिनने अवघ्या 29.85 सेकंदात सर्व सोंगट्या चेसबोर्डवर मांडत नवा विक्रम रचला आहे.


20 जुलै 2021 रोजी ओडेलिया जास्मिनने पुद्दुचेरी येथे हा विक्रम केला होता. पण, अलीकडेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सोशल मीडियावर या रेकॉर्डचा व्हिडिओ शेअर केला. यानंतर ओडेलिया जास्मिनने केलेल्या विश्वविक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला 62, 802 पेक्षा जास्त लाईक्स आले आहेत. तर, या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 


 



भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद बुद्धीबळाच्या खेळातील जागतिक क्रमवारीत अव्वल खेळाडू


भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद सध्या बुद्धीबळाच्या खेळातील जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.  प्रगननंदा हा मूळचा तामिळनाडूचा आहे. त्याने वयाच्या सातव्या वर्षी जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. त्यानंतर वयाच्या नऊव्या वर्षी त्याने 10 वर्षांखालील विजेतेपद पटकावले. ग्रँडमास्टर बनणारा तो जगातील पाचवा सर्वात तरुण बुद्धिबळपटू आहे. त्याला 2018 मध्ये ग्रँडमास्टरचा दर्जा मिळाला. तेव्हा त्याचे वय 12 वर्षे 10 महिने 13 दिवस होते.