नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मिरच्या पुलवामामध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. दलीपुरा विभागात ही चकमक सुरू असून पोलीस, एसओजी आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त अभियाना अंतर्गत शोध मोहीम सुरू आहे. या ठिकाणी काही दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. यानंतर त्यांच्या शोधासाठी संयुक्त अभियान राबवले गेले. अचानक समोरुन फायरिंग सुरू झाली. जवानांनी तात्काळ याचे उत्तर दिले. लगेचच संपूर्ण विभागाला घेरले गेले. यामध्ये एक जवान शहीद झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तसेच तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


जम्मू कश्मीरच्या शोपियां जिल्ह्यामध्ये रविवारी लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले होते. दक्षिण कश्मीरच्या शोपिंया जिल्ह्यातील हिंद सीतापूरमध्ये हे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर विभागात सर्च ऑपरेशन चालवण्यात आले. दहशतवाद्यांनी जवानांवर समोरुन फायरिंग केली. याच्या उत्तरात जवानांनीही फायरिंग केली. या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले होते.