नवी दिल्ली : ख्रिसमसच्या निमित्ताने रेल्वेने आपल्या प्रवाशांना एक खास गिफ्ट दिलं आहे. आता पुणे-सिंकदराबाद शहरांदरम्यानचा ११९४ किलोमीटरचा प्रवास अधिक आरामदायक होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी पुणे-सिकंदराबाद एक्सप्रेसला पुणे स्टेशनहून खासदार अनिल शिरोळे यांनी हिरवा झेंडा दाखवला. या ट्रेनची खासियत म्हणजे या ट्रेनमध्ये प्रवाशांना प्लेनसारख्या सुविधा मिळणार आहे. 


काय असणार सुविधा?


अत्याधुनिक सेवांसोबतच या ट्रेनमध्ये अनुभूती कोच सुद्धा लावण्यात आले आहेत. या कोचमध्ये अ‍ॅंटी ग्रेफ्टी पेंट करण्यात आलं आहे. ज्याने डब्यांवर स्कॅचेस पडणार नाहीत आणि ते साफ करणे सोपे होणार आहे. ट्रेनच्या प्रत्येक सीटच्या मागे एलईडी टीव्ही स्क्रीन लावण्यात आली आहे. यासोबतच ओव्हरहेड रिडींग लाईट, मोबाईल चार्जिंग, ऑटोमॅटीक स्लायडिंग गेट, वाय-फाय सुविधा, मॉड्युलर टॉयलेट सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. 


सहज ट्रेन करता येईल ट्रॅक


या ट्रेनच्या अनुभूती कोचमध्ये जीपीएस लावण्यात आलं आहे. ज्याने तुम्ही सहज गाडी ट्रॅक करू शकणार आहात. येणारं स्टेशन कोणतं आहे, ही माहिती सुद्धा यावर मिळणार आहे. 


ट्रेनमध्ये असणार एसी कोच


या ट्रेनमध्ये एकूण ९ एसी चेअर कार कोच असणार आहेत. एक एक्झिक्यूटीव्ह चेअर कार आणि एक अनुभूती कोच लावण्यात आलाय. सीटसमोर एलईडी स्क्रीन लावण्यात आली आहे. ज्यावर प्रवासी सिनेमे आणि इतर मनोरंजक कार्यक्रम बघू शकतील. प्रत्येक सीटसमोर बॉटल होल्डर आणि मॅगझीन होल्डर दिलं गेलंय. यासोबतच प्रत्येक सीटवर एक छोटा फोल्डेबल टेबलही देण्यात आलाय. या सीट्स रिक्लायनर आहेत ज्या मागे-पुढे करता येतील.


अनुभूती कोचच्या सीट्स फायरप्रूफ


अनुभूती कोचच्या सीट्स फायरप्रूफ आहेत. ड्ब्यांच्या आत खाली जे मटेरिअल लावण्यात आलंय त्याची चमक कायम रहावी असेच ठेवण्यात आले आहेत. सोबतच यावरून घसरू नये अशीही व्यवस्था करण्यात आली आहे.