पुणे : पुणे पोलिसांनी एका १८ वर्षाच्या बेपत्ता मुलीची माहिती गोळा करत आहेत. या मुलीचा काश्मीर घाटीत सुसाइड बॉम्ब म्हणून उपयोग केला जाऊ शकतो असा पोलीसांना संशय आहे.


अलर्ट जारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंटेलिजंस एजन्सी आणि काश्मीर पोलिसांनी यासंबंधी अलर्ट जारी केला आहे.  मुलगी आयसीसशी जोडली गेल्याचा संशय आहे. 


सुसाइड बॉम्ब  


१२ वी पास नंतर नर्सिंग करणाऱ्या मुलीचे पालक, तज्ञांसोबत एटीएसने काऊंसिलींग केले होते.


प्रजासत्ताक दिनी हिचा सुसाइड बॉम्ब म्हणून उपयोग होऊ शकतो असा वायरलेस अलर्ट आईजीपी काश्मीर झोनमधून आल्याचे  जेसीपी रविंद्र कदम यांनी सांगितले. 


प्रजासत्ताकही दिन साजरा


प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत जवानांना आदरांजली वाहिली. अमर जवान ज्योति येथे त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. 


भारत ६९ वा प्रजासत्ताकही दिन साजरा करतंय. या सोहळ्याला १० देशांचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. या परेडमध्ये २३ राज्यांचे चित्ररथ सादर केले जाणार आहेत.