निकालापूर्वीच `आप`ची `जिलेबी`, पक्ष कार्यालयाबाहेरील `या` बॅनरने वेधले सर्वांचे लक्ष
Punjab Election Results 2022 पंजाब निवडणूक निकालाकडे साऱ्यांच लक्ष
मुंबई : पंजाबचे निवडणूक निकाल येण्यापूर्वीच आम आदमी पक्षाचा विजयाबद्दलचा आत्मविश्वास दिसून आला आहे. (Punjab Election 2022 : Before the results, AAP made Jalebi and one special banner attract everyone ) पक्ष कार्यालयाबाहेर एक बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या निकालापूर्वीच सगळीकडे या बॅनरची चर्चा रंगली आहे. (Punjab Election Results 2022)
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच आम आदमी पक्षाला विजयाबद्दल पूर्ण विश्वास वाटत आहे. निकाल लागण्यापूर्वीच पक्षाच्या राष्ट्रीय कार्यालयाबाहेर आभाराचे बॅनर लावण्यात आले आहेत.
पक्ष कार्यालयाबाहेर आभाराचे बॅनर लावण्यात आले आहेत. यामध्ये पक्षाचे उमेदवार भगवंत मान यांचे आभार मानणारे बॅनर लावण्यात आले आहेत.
पंजाब निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये आम आदमी पार्टीचा विजय झाल्याचे दाखवले जात आहे. यानंतर पक्षाला आपल्या विजयाबद्दल पूर्ण विश्वास वाटत आहे.
पक्ष कार्यालयाबाहेर भगवंत मान यांचे छायाचित्र असलेले आभाराचे बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र, तरीही ते पांढऱ्या कापडाने झाकलेले आहे. याशिवाय कार्यालयाला आतमध्ये फुले व फुगे लावून सजावट करण्यात आली आहे.
निकालाआधीच जलेबी तयार
यासोबतच आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री उमेदवार भगवंत मान यांच्या संगरूर येथील निवासस्थानी फुलांची सजावट करण्यात आली आहे. सकाळपासून तिथे जिलेबी तयार केल्या जात आहेत.
1304 उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय
आज सकाळी ८ वाजल्यापासून पंजाब विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. पंजाबमधील एकूण 117 विधानसभा जागांवर अनेक उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.
पंजाबमध्ये २० फेब्रुवारीला मतदान झाले होते. या निवडणुकीत एकूण 1304 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 1209 पुरुष तर 93 महिला उमेदवार आहेत. तर दोन उमेदवार ट्रान्सजेंडर आहेत.