मुंबई : पंजाब सरकारने नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा आणि कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना महामारीनंतर जवळपास ६ महिन्यांनंतर शाळा आणि कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेत सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जाणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारच्या गाईडलाईननुसार पालकांच्या परवानगीनंतरच विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची अनुमती मिळणार आहे. पंजाब सरकारने स्पष्ट केलं आहे की, केंद्र सरकारद्वारे देण्यात आलेल्या गाईडलाईननुसार सर्व शाळा सुरू केले जाणार आहेत.  


केंद्र सरकारचे नियम 


केंद्र सरकारने दिलेल्या गाईडलाईननुसार शाळेचं सेनिटायझेशन करण आवश्यक आहे. 


फर्निचर, स्टेशनरी, स्टोरेज प्लेस, वाटर टँक, किचन, कँटीन, लॅबोरेटरीसह अनेक जागा सेनिटाइज करण बंधनकारक आहे.