मुंबई : पंजाबमधील  (Punjab) कोरोना विषाणूचा (Coronavirus)वाढता प्रादुर्भाव आणि संकट पाहून सरकारने कडक पाऊल उचलले आहे. पंजाब सरकारने पुन्हा कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी लॉकडाऊन  (Lockdown)जाहीर केले आहे. परंतु हे लॉकडाऊन-१ या प्रमाणे इतके कठोर असणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार पंजाबमध्ये शनिवार आणि रविवार तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी संपूर्ण लॉकडाऊन असेल. म्हणजेच शनिवार आणि रविवार तर सरकारी सुट्टीच्या दिवशी दुकाने उघडली जाणार नाहीत. याशिवाय राज्यात वाहतुकीवरही बंदी घालण्यात आली आहे.


आदेशानुसार केवळ ई-पास असलेल्या लोकांनाच येणे आणि जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. याखेरीज पंजाब सरकारने हे स्पष्ट केले आहे की औद्योगिक युनिट आठवड्यातून सात दिवस सुरू असतील.


पंजाबमध्ये कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. सध्या राज्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या २८०५ आहे, तर या साथीमुळे ५५ लोकांचा बळी गेला आहे.