नवी दिल्ली : पाकिस्तानच्या तेहरीक-ए-इंसाफचे प्रमुख इमरान खान यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांना फोन करुन शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रण दिलं आहे. सिद्धूने इमरान खान यांचं आमंत्रण स्विकारलं आहे. त्यांची याची माहिती गृह मंत्रालय आणि पंजाब सरकारला दिली आहे. सिद्धू यांनी म्हटलं की, ते या शपथविधी सोहळ्यासाठी जाणार आहेत. इमरान खान 18 ऑगस्टला पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. नवज्योत सिद्धू सोमवारी दिल्लीतील पाकिस्तान हाईकमीशनमध्ये विजा घण्यासाठी आले होते.



इमरान खान यांनी सुनील गावस्कर, कपिल देव यांना देखील आमंत्रण दिलं आहे. सिद्धू यांनी म्हटलं की, "ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. प्रतिभा असलेल्या व्यक्तींची प्रशंसा केली पाहिजे. ताकदवान व्यक्तीला लोकं घाबरतात. पण चरित्रवान व्यक्तीवर लोकं विश्वास ठेवतात. खान साहेब हे चरित्रवाले व्यक्ती आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवला जावू शकतो. मी भारताच्या परराष्ट्र धोरणांचा सन्मान करतो. पण इमरानने दिलेल्या व्यक्तिगत निमंत्रण देखील स्विकारतो. खेळाडू नेहमी पूल बनवतो. जो लोकांना जोडतो.'