मुंबई : Punjab National Bank Facility: पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त सुविधा आणली आहे. आपल्या ग्राहकांचे हित लक्षात घेऊन बँकेने कर्ज EMI देण्याची पद्धत अतिशय सोपी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक खास सुविधा सुरू केली आहे. आपल्या ग्राहकांचे हित लक्षात घेऊन बँकेने कर्ज EMI देण्याची पद्धत अतिशय सोपी केली आहे. आता पीएनबीच्या ग्राहकांना कर्जाचा हप्ता जमा करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. आता ग्राहक घरबसल्या सहजपणे कर्जाची परतफेड करू शकतात.


बँकेने ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. आता ग्राहक Google Pay, Paytm आणि Phone Pe द्वारे देखील कर्जाची परतफेड करू शकतात.


धनादेशाद्वारे हफ्ता


पूर्वीच्या ग्राहकांना कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बँकेचे धनादेश द्यावे लागायचे. हे धनादेश घेऊन ग्राहक बँकेत जात असत. 'झी बिझनेस'ने दिलेल्या माहितीनुसार, आता पीएनबीने नवीन सुविधा सुरू करून कर्जाचा हप्ता परत करणे खूप सोपे केले आहे. म्हणजेच, आता तुम्ही तुमचे EMI UPI द्वारे सहज भरू शकता.


पेमेंट कसे करायचे?


  • यासाठी तुम्ही UPI अॅपद्वारे 'Fetch and Pay Solution' या पर्यायातून VALIDATE वर क्लिक करा.

  • यामुळे तुमचे पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्सफर होणार नाहीत.

  • यानंतर, पैसे हस्तांतरित करण्यासाठी तुम्ही तुमचे कर्ज खाते निवडा.

  • एकदा त्याची पडताळणी झाली की, तुम्ही सहजपणे पैसे ट्रान्सफर करू शकाल.

  • यूपीआयच्या वाढत्या क्रेझमुळे पीएनबीनेही ही सुविधा सुरू केली आहे.