या बॅंकेत तुमचं खातं तर नाही ना?
तुम्ही जर पंजाब नॅशनल बॅंकेचे (PNB) ग्राहक असाल तर, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण, तब्बल २०० ते ३०० शाखा PNB बंद करण्याचा किंवा अन्य बॅंकेमध्ये विलीन करण्याचा विचार करत आहे.
नवी दिल्ली : तुम्ही जर पंजाब नॅशनल बॅंकेचे (PNB) ग्राहक असाल तर, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण, तब्बल २०० ते ३०० शाखा PNB बंद करण्याचा किंवा अन्य बॅंकेमध्ये विलीन करण्याचा विचार करत आहे.
PNB हे पाऊल बॅंक कंसॉलिडेशन प्लान अंतर्गत उचलत आहे. PNB ही योजना राबवायला आता फार वेळ लावणार नाही. येत्या ११ ते १२ महिन्यातच ही प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. ही प्रक्रिया PNBच्या त्या शांखांबाबत घेतला जाईल. ज्या शाखांमध्ये फायदा होत नाही. बॅंकेचे मुख्य निदेशक सुनील मेहता यांनी सांगितले की, व्यवहारांतील रणनीतीमध्ये बदल करण्यासाठी आणि शाखांना तोट्यातून बाहेर काढण्यासाठी हे पाऊल उचल जात आहे.
मेहता यांनी पुढे सांगितले की, PNBच्या काही शाखा यापूर्वीच बंद करण्यात आल्या आहेत. आमचा एक विभागच यासाठी काम करत आहे. हा विभाग तोट्यात असलेल्या शाखांना कसे बाहेर काढायचे यावर विचार करत आहे. त्यासाठी काही शाखा बंद करण्यात येतील. तर, काही शाखांना इतर बॅंकांमध्ये विलीन केले जाईल.