नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंकेत झालेल्या ११५०० हजार कोटींच्या घोटाळ्या बाबतीत प्रथमच बॅंकेने काहीतरी पाऊले उचलली आहेत. बॅंक मॅनेजमेंटने गेल्या एका आठवड्यात सुमारे १८ हजार कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सीबीआय सातत्याने बॅंकेतील कर्मचाऱ्यांना अटक करत असताना या बदल्या करण्यात आल्या. आतापर्यंत सीबीआयने बॅंकेतील ३ कर्मचारी आणि जनरल मॅनेजरला अटक केली आहे.


कालपासून सुरू केली तयारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाब नॅशनल बॅंकेने काल या बदल्यांची तयारी सुरू केली. ट्रान्सफर लिस्ट बुधवारी २१ फेब्रुवारीला बाहेर आली. केंद्रीय सतर्कता आयोगाच्या ऑर्डरनुसार बॅंकेने कारवाई सुरू केली. या घोटाळ्यात सीबीआयने आतापर्यंत पीएनबीच्या मुंबई शाखेतून सुमारे १३ ऑफिसर्संना अटक केली आहे. 


अॅडव्हायजरीनुसार...


सीव्हीसीने मंगळवारी बॅंकांसाठी अॅडवायजरी जाहीर करण्यात आली. यात असे लिहिले आहे की,  २१ फेब्रुवारीपर्यंत ३ वर्षांहून अधिक काळापर्यंत एकाच पोस्टवर असणाऱ्या ब्रॅंचमधील ऑफिसर्स आणि ५ वर्षांहुन अधिक काळापर्यंत एकाच बॅंकेत काम करणाऱ्या क्लार्क यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यानंतर बदलीची प्रक्रिया सुरू झाली.