Accident News : आजकाल तरुणाई सोशल मीडियावर रील (Reels) बनवण्याच्या नादात कोणत्याही थराला जात आहे. रील तयार करताना अनेकदा तरुणाई आपला जीव देखील पणाला लावत आहे. रील बनवताना तो विसरतो की धोकादायक स्टंटमुळे (Bike Stunt) त्याचा जीव देखील जाऊ शकतो. पंजाबमधील (Punjab News) अमृतसरमध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत दुचाकीवर रील बनवताना स्टंटबाजी करणाऱ्या तरुणीचे डोके ग्रीलला धडकून शरीरापासून वेगळे झाले आणि तिचा जागीच मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमृतसरच्या छेहरता येथील नारायणगढ परिसरात शनिवारी रात्री 1.45 च्या सुमारास स्टंट करताना वेगात असलेल्या दुचाकी चालवणाऱ्या मुलीचे डोके धडापासून वेगळं झालं आहे. स्टंट करताना भरधाव वेगात असलेली दुचाकी बीआरटीएस ग्रीलला धडकली आणि हा भीषण अपाघात घडला. छेहारटा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर दुचाकीवर मागे बसलेला युवक गंभीर जखमी झाला आहे. गुमानपुरा येथील रहिवासी पलकप्रीत कौर असे मृत तरुणीचे नाव असून गुरप्रीत सिंग असे जखमी तरुणाचे नाव आहे.


शनिवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. जखमी तरुण गुरप्रीत सिंगने सांगितले की, तो स्वच्छतागृहाचे काम करतो. शनिवारी रात्री अकरा वाजता तो गावात काकासोबत दारू पीत होता. यानंतर तो छेहारता येथील काकांना घरी सोडण्यासाठी निघून गेला होता. दरम्यान, तिच्या शेजारी राहणाऱ्या पलकप्रीत कौरने त्यांना थांबवले आणि तिच्यासोबत येण्याचा आग्रह केला. पलकप्रीतनेही मद्यप्राशन केले होते.


जागीच शीर धडापासून वेगळे


गुरप्रीत सिंगने काकांना घरी सोडल्यानंतर ते रात्री दीडच्या सुमारास घरी परतत होते. दरम्यान, पलकप्रीतने दुचाकी चालवण्यास सुरुवात केली. ती मद्याच्या नशेत होती आणि सुसाट वेगाने दुचारी चालवत होती. दुचाकी चालवताना तिने स्टंट करायला सुरुवात केली. गुरप्रीत पलकप्रीतला स्टंट करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तिने त्याचे ऐकले नाही. त्याच्यवेळी नारायणगढ दाणा मंडईजवळ त्यांच्या दुचाकीचा तोल गेला आणि ती ग्रीलला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की पलकप्रीतचे शीर धडापासूनच वेगळे झाले आणि तिचा जागीच मृत्यू झाली. तर गुरप्रीत सिंगचा एक पाय मोडला. 


प्रत्यक्षदर्शींनी सांगितला अपघाताचा थरार


कशीतरी या अपघाताची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. कुटुंबियांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गुरप्रीतला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपास सुरु करत घटनेची माहिती घेतली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, "अपघात झाला तेव्हा पलकप्रीतने मद्य प्राशन केले होते. पलकप्रीत मद्यधुंद अवस्थेत होती आणि दुचाकी चालवून स्टंट करत होती. हा अपघात इतका भीषण होता की, ग्रीलला आदळल्याने तिचे डोके जागीच धडापासून वेगळे झाले."


कुटंबियांचे ऐकत नव्हती पलकप्रीत


दरम्यान, पलकप्रीत कौर तिच्या कुटुंबीयांचे कधीच ऐकत नव्हती. ती अनेकदा गावातल्या मुलांसोबतच राहायची. त्यामुळेच तिने मद्य पिण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचे आजूबाजूचे सीसीटीव्हीही तपासत आहेत. पलकप्रीत आणि गुरप्रीत स्टंटबाजी करताना मोबाईलवर व्हिडिओ बनवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. या दोघांकडे ड्रायव्हिंग लायसन्सही नसल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.