अमृतसर : भररस्त्यात शिवसेना पदाधिकाऱ्याची  गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पंजाबमधील अमृतसर (Amiratsar) येथे ही घटना घडली आहे. भरदिवसा घडलेल्या या हत्याकांडामुळे अमृतसर मध्ये एकच खळबळ उडाली आहे. गर्दीचा फायदा घेत हल्लेखोर घटनास्थळावरुन (Maharashtra Politics) पसार झाले. जखमी अवस्थेत असलेल्या या पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्यांनी तात्काळ  रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. सुधीर सुरी (Sudhir Suri) असे मृत शिवसेना पदाधिकाऱ्याचे नाव आहे. गोपाळ मंदिर परिसरात कचरा कुंडीजवळ देव देवत्यांच्या मृर्ती आढळल्या होत्या. याच्या निषेधार्थ सुधीर सुरी यांनी मंदिराबाहेर आंदोलन सुरु केले होते. मंदिराबाहेर त्यांचे आंदोलन सुरु असतानाच अज्ञात हल्लेखोरांनी (Latest Political Update) त्यांच्यावर हल्ला केला. (Punjab Shiv Sena leader Sudhir Suri shot dead during protest in Amritsar)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरी यांच्यावर बंदूकीतून गोळ्या झाडण्यात आल्या. गोळीबारानंतर गर्दीचा फायदा घेत हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. गोळीबारानंतर आंदोलनस्थळावर एकच गोंधळ उडाला. गोळ्या लागताच सुधीर सुरी जमीनीवर कोसळले. कार्यकर्त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना रुग्णालायात नेले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. 


या घटनेनंतर पोलिसांनी सपूर्ण परिसर सील करुन नाकाबंदी केली आहे. पोलिसांची (Police) विशेष पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत. यापूर्वी देखील सुधीर सुरी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. एका टोळ्याने सुधीर सुरी यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला होता. मात्र, हल्ल्याआधीच पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. यामुळे सुधीर सुरी यांच्यावरील हल्ल्याचा कट फसला होता.