युपीत बनणार देशातील सर्वात लांब रस्ता
अखिलेश सरकारने लखनऊ आगरा एक्सप्रेस बनवला होता. आता योगी सरकार गाजीपुर पर्यंत सर्वात लांब एक्सप्रेसवे बनविण्याच्या तयारीत आहे.
लखनऊ : अखिलेश सरकारने लखनऊ आगरा एक्सप्रेस बनवला होता. आता योगी सरकार गाजीपुर पर्यंत सर्वात लांब एक्सप्रेसवे बनविण्याच्या तयारीत आहे.
याला 'पूर्वांचल एक्सप्रेस वे' नाव देण्यात आले आहे.
लखनऊ ते गाजीपुर पर्यंतच्या या रस्त्यासाठी ३५३ कि.मी लांब रस्त्यासाठी २५ हजार कोटी रुपये खर्चाचा अंदाज लावण्यात आलाय.
असा आहे मार्ग
हा रस्ता पूर्वांचल एक्सप्रेस वे लखनऊ, बाराबंकी, फैजाबाद, अंबेडकरनगर, अमेठी, सुल्तानपुर, आजमगढ़, मऊ आणि गाजीपुर येथून जाणार आहे.
४ तासात प्रवास
हा एक्सप्रेस वे ६ लेनमध्ये असून ८ लेनपर्यंत वाढविण्यात येणार आहे. यामूळे लखनौ ते गाजीपूर प्रवास ४ तासात होणार आहे.
अडीच वर्षात पूर्ण
'पूर्वांचल एक्सप्रेस वे' अडीच वर्षात पूर्ण होणार आहे.