मुंबईः 'पुष्पा' चित्रपटातील 'मैं झुकेगा नही...' हा डायलॉग प्रचंड गाजला. अनेकांनी त्याच्यावर डायलॉगही बनवले. सोशल मीडियावर आता असा एक व्हिडिओ समोर आला आहे तो पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या चार-पाच महिन्यांपासून सोशल मीडियावर 'पुष्पा फिव्हर' सुरू आहे. दक्षिण भारतीय स्टार अभिनेता अल्लू अर्जुनचे डायलॉग्स लोक अजूनही कॉपी करत आहेत.


इतकंच नाही तर देशभरातील तरुण, वडिल आणि मुलं 'पुष्पा' चित्रपटातील 'मैं झुकेगा नहीं...' हा लोकप्रिय डायलॉग बोलत आहेत. हजारो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.


या व्हिडिओमध्ये एक मुलगा अल्लू अर्जुनचा 'मैं झुकेगा नही' हा डायलॉग बोलताना दिसत होता जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला चोपण्यासाठी काठी आणली.


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा आईजवळ बसून रडत आहे. मोठ्याने रडणारे मुलाला आई शांत करण्याचा प्रयत्न करते


यादरम्यान मुलाचे वडील काठी आणतात आणि त्याला मारण्यासाठी पुढे जातात. तो वडिलांना घाबरत नाही, उलट त्याच्यासमोर 'मैं झुकेगा नहीं...'चा डायलॉग बोलतो. एक-दोन नव्हे तर वारंवार वडिलांसमोर ''मैं झुकेगा नहीं...' असे म्हणतो. त्याच वेळी, मुलाची आई हसत हसत मुलाकडे पाहते आणि त्याला मारण्यापासून थांबवते.



लहान मुलाचे वडील त्याला घाबरवण्यासाठी त्याला वारंवार काठी दाखवतात, पण तो त्याच्या हनुवटीवर हात फिरवत 'पुष्पा' हा लोकप्रिय संवाद पुन्हा पुन्हा सांगतो. काही सेकंदांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय


हा व्हिडिओ फेसबुकवर 'पूर्णिया तक' या पेजने शेअर केला आहे. 21 सेकंदाचा व्हिडिओ 9 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.