मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सगळी सिनेमागृह बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे सिनेमाप्रेमी हे सिनेमागृह कधी सुरु होणार याकडे लक्ष ठेऊन आहेत. परंतु आता सिनेमाप्रेमींसाठी चांगली बातमी समोर आली आहे. कारण आता सिनेमा पाहत पॉपकॉर्न खाण्यासाठी आणि आपल्या आवडत्या चित्रपटाचा पहिला शो पाहण्यासाठी तुम्हाला आणखी वाट पाहावी लागणार नाही.  त्यात जर तुम्ही पूर्णपणे लसीकरण केले असेल, तर तुम्हाला मोफत चित्रपट तिकिटे मिळू शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीव्हीआर सिनेमा एक उत्तम ऑफर घेऊन आला आहे ज्याला “JAB” ऑफर असे त्यांनी नाव ठेवले आहे. या ऑफरच्या मदतीने तुम्ही चित्रपटाचे तिकीट मोफत मिळवू शकता. अधिकाधिक लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हा उपक्रम पीव्हीआरकडून राबवण्यात आला आहे.


तुम्हाला आता दोन्ही डोस घेतल्यावर मोफत तिकिटे मिळतील आणि ते सुद्धा तुमच्या जवळच्या PVR थिएटरमध्ये. कंपनीच्या मते, ही ऑफर लसीकरण केलेल्या लोकांना अतिरिक्त तिकिटे मोफत प्रदान करण्यात येतील. विनामूल्य तिकीट व्यतिरिक्त, लसीकरण केलेल्या लोकांना पहिल्या दोन आठवड्यांत पॉपकॉर्न टब खरेदी केल्यावर दुसरा एक पॉपकॉर्न टब विनामूल्य मिळेल.


कोविड -19 लसीचे दोन शॉट्स घेतल्याने लोकांना त्याचे इतके फायदे मिळतील याची कोणीही कल्पना नसावी.


PVR ऑफर 12 ऑगस्ट पर्यंत वाढवली


PVR jab ऑफर 12 ऑगस्ट 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही ऑफर तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरी वगळता सर्व चित्रपट आणि सर्व सिनेमा हॉलवर लागू आहे, जिथे PVR उघडण्याची परवानगी आहे.


नवीन ग्राहकांसाठी ऑफर व्यतिरिक्त, पीव्हीआरच्या काही प्रिविलेज ग्राहकांना तिकीट आणि खाण्यावर खर्च करून 2X गुण मिळवण्याची संधी देखील देत आहे.


ही ऑफर कोणत्याही भाषेच्या, जॉनरच्या सर्व चित्रपटांवर वैध आहे. त्याचप्रमाणे चित्रपट पाहणाऱ्यांना दुसऱ्या तिकिटावरही 150 रुपयांपर्यंत सूट मिळेल. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी वैध आहे. जर तुम्हाला मोफत तिकिटे मिळवायची असतील, तर तुम्ही बुकमाईशो व्यतिरिक्त पीव्हीआर वेबसाइट, मोबाईल अॅप आणि सिनेमावर तुमचे तिकीट बुक करू शकता.


पीव्हीआरने 30 जुलैपासून त्या राज्यांमध्ये कामकाज पुन्हा सुरू केले ज्यांनी सिनेमागृहे उघडण्याची परवानगी दिली होती. कंपनीने घोषित केले होते की, त्याच्या सर्व कर्मचाऱ्यांना कोविड -19 चे पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे.