`कुमारस्वामी मुख्यमंत्री राहतीलच असे नाही`
पाच वर्ष मुख्यमंत्री राहतील का असा प्रश्न विचारल्यावर...तसं कुठलही आश्वासन दिलेलं नाही, असं उत्तर दिलं.
कर्नाटक : कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आज विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहेत. जेडीएस आणि काँग्रेसनं मिळून सत्ता स्थापन केलीय.. त्यांच्याकडे ११७ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा कुमारस्वामींनी केलाय. बहुमतासाठी ११२ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सरकार आज बहुमत सिद्ध करेल असचं चित्र आहे. पण काँग्रेस आणि जेडीएसमध्ये सारं काही आलेबेल आहे असं चित्र दिसत नाही. शपथविधीनंतर बुधवारी उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत कुमारस्वामी पाच वर्ष मुख्यमंत्री राहतील का असा प्रश्न विचारल्यावर...तसं कुठलही आश्वासन दिलेलं नाही, असं उत्तर दिलं. त्यामुळे सरकारच्या स्थैर्याविषयी प्रश्नचिन्हं उपस्थित होऊ लागलंय.