मुंबई : रायबरेली येथील देवानंदपुरमधील गांधी सेवा निकेतन शाळेत सोमवारी विद्यार्थ्यांनी शिक्षिकेलाच मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून आता तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओत मुलं सुरूवातीला शिक्षिकेशी वाद घालत आहेत. त्यानंतर एका मुलाने शिक्षिकेची बॅग उचलून फेकून दिली. नंतरही वाद सुरूच होता. त्यानंतर विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या कानाखाली मारली असून खुर्ची त्यांच्या अंगावर फेकून दिली. 



महिला अधिकारी ममता दुबेंनी दिलेल्या माहितीनुसार, मी गांधी सेवा निकेतन आश्रमात काम करते. संस्थेतील सदस्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण करण्यासाठी उद्युक्त केलं. मला कानाखाली मारून, मला कानाखाली मारण्यात आली. मी या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. 



तसेच महिला शिक्षिकेने सांगितल्यानुसार, विद्यार्थ्यांनी तिला वॉशरूममध्ये गेल्यावर बाहेरून कढी लावली होती. याबाबत संस्थेशी बोलले तर, विद्यार्थी आहेत काहीही करू शकतात असं उत्तर दिलं. 2 दिवसांनी मी शाळेत गेल्यावर विद्यार्थ्यांनी मला मारहाण केली.