मुंबई : ठाण्यातील नितीन कंपनी जवळील उड्डाण पुलावर आज सकाळी काही अज्ञात व्यक्तींकडुन एक बॅनर लावण्यात आला. या बँनर मध्ये  काकु, मामा, मामी, दादा, ताई, राफेलची फाईल हरवली आहे. कुठे मिळते का बघा?  कपाटात शोधा, गादीखाली शोधा. मिळाल्यास चौकीदाराची संर्पक साधा., असे आवाहन करण्यात आले आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे या बँनर वर कोणत्याही पक्षाचे नाव अथवा चिन्ह नसल्याचे दिसत आहे.  आज सकाळ पासून हे बॅनर ठाणेकरांना पहायला मिळत आहे. बुधवारी सुप्रीम कोर्टात राफेलप्रकरणी झालेल्या सुनावणी वेळी अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी राफेल कराराची कागदपत्रे चोरी झाल्याचे सुप्रीम कोर्टाला सांगितले होते. एकीकडे पंतप्रधान मोदी हे चौकीदार असल्याचे सांगत आहेत. मात्र या चौकीदाराच्या ताब्यातुनच ही कागदपत्रे चोरीला गेल्यामुळे नागरिकांमध्ये सांताप व्यक्त केला जात आहे. 


राफेल करार संदर्भाच्या कागदपत्रे गोपनीय होती, परंतु या कागदपत्रांच्या  फोटोकॉपीज काढल्यामुळे ती सार्वजनिक झाली. असे सांगितल्या नंतर देखील विरोधी लोकांकडून सरकार वर टीका करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधकांसह देशभरातून सर्वांनी सरकारवर टीका करणे सुरु केले आहे.  त्यामध्ये सामान्य नागरिकही सहभागी झाले आहेत.


राफेल करारावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी शनिवारी अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला. ते म्हणाले, 'बुधवारी सरकारने सर्वोच्च न्यायालयात राफेल करारसंदर्भातील कागदपत्रे चोरीला गेल्याचा दावा केला. त्यानंतर शुक्रवारी मूळ कागदपत्रे नव्हे तर त्याच्या छायांकित प्रती चोरीला गेल्याचे सरकारने सांगितले. याचा अर्थ चोराने गुरुवारी राफेलची कागदपत्रे परत आणून ठेवली असतील' असे वक्तव्य पी. चिदंबरम यांनी केले.