गर्ल्स हॉस्टेलमध्ये रॅगिंग, सर्व विद्यार्थिंनींना दंड
बिहारमधील दरभंगा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील एका विद्यार्थिंनी सोबत रॅगिगचं प्रकरण समोर आलं आहे. पीडित तरुणीने मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रार दाखल केली. महाविद्यालयीन प्रशासनाने तक्रार न करता या तरुणीने एमसीआयकडे सरळ तक्रार केली.
पाटणा : बिहारमधील दरभंगा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील एका विद्यार्थिंनी सोबत रॅगिगचं प्रकरण समोर आलं आहे. पीडित तरुणीने मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रार दाखल केली. महाविद्यालयीन प्रशासनाने तक्रार न करता या तरुणीने एमसीआयकडे सरळ तक्रार केली.
तक्रारीनंतर एमसीआयच्या आदेशानुसार महाविद्यालयाला वसतिगृहातील त्या सर्व विद्यार्थिंनीवर 25-25 हजारांचा दंड लावण्यात आला आहे. या दोषी मुलींना 25 नोव्हेंबरपर्यंत दंड जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कॉलेजने सुरक्षेच्या कारणास्तव त्या पीडित विद्यार्थिनीचं नाव जाहीर नाही केले. पीडित तरुणी समोर न आल्याने आरोपींची ओळख नाही पटू शकली. त्यामुळे हॉस्टेलमधील सर्वच 54 तरुणींवर 25 हजारांचा दंड लावण्यात आला. दंड न भरल्यास विद्यार्थिंनींना ६ महिने वर्गातून निलंबित करण्याचे आदेश देखील कॉलेजला देण्यात आले आहेत.