नवी दिल्ली : जगभरात मानाचा समजल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारासाठी यंदा भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे (RBI)माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. राजन यांना हा पुरस्कार मिळाल्याच नोबेल विजेत्या भारतीय चेहऱ्यात त्यांचा समावेश होणार आहेत. नजर टाकूया नोबेल विजेत्या भारतीय चेहऱ्यांवर...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत नोबेल विजेत्या भारतीय चेहऱ्यांमध्ये रविंद्रनाथ टागोर(साहित्य), हरगोविंद खुराणा (वैज्ञानिक), सी व्ही रामन (भौतिक शास्त्र), व्ही एस नायपॉल (साहित्य), व्यंकटेश रामाकृष्णन (रसायनशास्त्र), मदर तेरेसा (समाजकार्य), सुब्रह्मण्यम चंद्रशेखर  (एस्ट्रोफिजिक्स), कौसाश सत्यार्थी (बालकांसाठी विशेष कार्य), आर के पचौरी (पर्यावरण), अमर्त्य सेन (अर्थशास्त्र) या चेहऱ्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. समाजकार्य आणि विशिष्ट क्षेत्रात केलेल्या सखोल संशोधनासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. राजन यांना जर हा पुरस्कार मिळाला तर, त्यांचेही नाव या यादीत झळकणार आहे.


यंदाच्या अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारासाठी विविध नावांची चर्चा आहे. यात रघुराम राजन यांच्या नावाची चर्चा अग्रक्रमावर आहे. वॉल स्ट्रीट जनरलने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तत क्लेरीवेट अॅनॅलिटिक्सने नोबेलसाठी तयार केलेल्या सहा नावांच्या संभाव्य यादीत राजन यांचे नाव आहे. अर्थात या यादीत नाव आले याचा अर्थ पुरस्कारासाठी निवड झाली असा होत नाही. पण, निवडसमिती जेव्हा नोबेलसाठी नावाची घोषणा करते त्यापूर्वी या नावांचा जरूर विचार करते.


क्लेरीवेट अॅनॅलिटिक्सचे मंडळ नोबेलसाठी सुमारे बारा नावांची घोषणा करते. योग्य व्यक्तीला हा पुरस्कार मिळावा आणि त्याच्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी ही संस्था सतत संशोधन करत असते. रघुराम राजन यांनी कॉर्पोरेट फायनान्स क्षेत्रात चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची नोबेलसाठी चर्चा आहे. अर्थशास्त्रातील नोबेलची घोषणा सोमवारी केली जाऊ शकते.


रघुराम राजन अल्पपरिचय


रघुराम राजन हे सलग तीन वर्षे आरबीआयचे गव्हर्नर राहिले आहेत. आरबीआयच्या गव्हर्नर पदावरून पायउतार झाल्यावर ते सध्या शिकागो विद्यापीठात बूथ स्कूल ऑफ बिजनेसचे प्रोफेसर म्हणून काम करत आहेत. तेथे ते आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट फायनान्स हा विषय शिकवतात. राजन यांच्याबाबत बोलताना शिकागो बूथ स्कूलने म्हटले आहे की, २०१६-१७च्या अभ्यासक्रमात ते समग्र जागतिक अर्थव्यवस्थेतील कॉर्पोरेट फायनान्स आणि इन्वेस्टेमेंटसमोरील आव्हाने यावर अभ्यास करतील.


राजन यानी २०१३ मध्ये आरबीआयचे गव्हर्नर म्हणून सूत्रे हाती घेतली. आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. आपल्या निर्णयांमुळे अनेकदा ते चर्चेत आले. तसेच, वादातही अडकले.