नवी दिल्ली : भारतातून काळा पैसा हद्दपार करण्यासाठी आपण नोटाबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला, असा दावा मोदी सरकार केला असला तरी हा दावा रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी खोडून काढलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उलट, नोटाबंदीमुळे रिझर्व्ह बँकेवरचं ओझं वाढणार आहे, असं राजन यांनी म्हटलंय. नोटाबंदीनंतर काळा पैसा चलनातून हद्दपार करण्याचा सरकारचा केविलवाणा प्रयत्न सपशेल फसलाय. नोटाबंदीमुळे लोकांना काळा पैसा पांढरा करण्याचा नवा मार्ग सापडला. शिवाय, बँकेत जमा झालेल्या काही हजार करोड रुपयांवर नागरिकांना व्याजही द्यावं लागणार आहे, यामुळे आरबीआयवरचं ओझं वाढणार आहे, असं रघुराम राजन यांनी म्हटलंय.


शिवाय, नोटाबंदी काळात ज्यांनी आपला काळा पैसा पांढरा करून घेतलाय तेही या पैशांवर व्याज कमावणार आहेत. आरबीआयवरचं हे ओझं जवळपास वार्षिक २५ हजार करोड रुपये असू शकतं, असा दावा राजन यांनी केलाय. 


या अगोदर एका कार्यक्रमात बोलताना राजन यांनी 'आपण कधीही नोटबंदीचं समर्थन केलं नव्हतं... इतकंच नाही तर मोदी सरकारला याच्या दुष्परिणांबाबत आपण अगोदरच सतर्क केलं होतं' असंही म्हटलं होतं.