#RahoDoKadamAagey: बऱ्याचदा माहित असूनही आपण अनेक ऑनलाईन फ्रॉड ला बळी पडतो ,आपल्या इनबॉक्स मध्ये असे काही मेसेजेस येतात कि, आपल्याला ते बऱ्याचदा काहीसे खटकतात  .


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्याला वारंवार बँकांकडून सांगण्यात येत कोणालाही बँक डिटेल्स शेर करू नका पण तरीही काहीजण अश्या काही मेसेजेसना नादी लागून डिटेल्स शेर करतात.


आणि त्याचा फटका आपल्याला बसतो. आपलं बँक  खात पूर्णपणे रिकामं होऊ शकत इतकंच काय आपला सगळा पर्सनल डेटा हॅक होऊ शकतो.


त्यांनी  दिलेले ऑफर विश्वास न बसण्यासारखे असतात पण तरीही  बरेच लोक या लिंकवर क्लिक करतात आणि आर्थिक फसवणुकीचे बळी होतात.


गुगल, ‘सेफर विथ गुगल’ उपक्रमांतर्गत आपल्या नवीनतम मोहिमेत, या सामान्य धोक्याबद्दल जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न करत असते नुकतंच गूगल ने एक कॅम्पेन सुरु केलं आहे.



ज्यात अनेक सेलेब्रिटींचा सहभाग आहे त्यांनी ग्राहकांना दोन पावलं पुढे येऊन विचार करा म्हणजेच ##RahoDoKadamAagey सध्या खूप trending आहे.



या अंतर्गत ग्राहकांना जागरूक करण्याचं काम  हाती घेतलं आहे कि जेणेकरून ग्राहकांना काही गोष्टी समजतील आणि त्याचा फायदा त्यांना होईल आणि परिणामी ऑनलाईन फ्रॉड होण्याच्या प्रमाणाला आळा बसेल.