नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गुजरात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्याच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी पुन्हा राहुल गांधी गुजरातच्या तीन दिवसांच्या दौ-यावर पोहोचले आहेत. यावेळी ते उत्तर गुजरातचा दौरा करत आहे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गडा मानला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधींनी मंदिरात जावून दौऱ्याची सुरुवात केली. गांधीनगरच्या अक्षरधाम मंदिराला त्यांनी भेट दिली. येथे त्यांनी टिळक पूजन करुन दौऱ्याला सुरुवात केली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते देखील यावेळेस उपस्थित होते.


राहुल गांधी तीन दिवसांच्या दौऱ्यात उत्तर गुजरातच्या सहा जिल्ह्यांना भेट देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, ते विविध समुदायातील महिला, ग्रामस्थ आणि जनतेला भेटतील. बनासकांठा जिल्ह्यातील अंबाजी मंदिराला ही ते भेट देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये काँग्रेसच्या बाजूने वातावरण निर्माण करण्यासाठी राहुल गांधी एक प्रभावी मोहीम चालवत आहे. पुढील महिन्यात गुजरातमध्ये निवडणुका होणार आहेत.