नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात प्रत्येक रॅलीत राहुल गांधी भाजपवर हल्लाबोल करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी ९ ते ११ ऑक्टोबर दरम्यान गुजरात दौऱ्यावर होते. बुधवारी छोटा उदयपूर येथे संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी राहुल गांधी आयोजित ठिकाणी दाखल झाले. मात्र, तेथे त्यांना एका लाजीरवाण्या प्रकाराचा सामना करावा लागला.


छोटा उदयपूप येथे आयोजित 'संवाद' कार्यक्रमात राहुल गांधी तरुणांसोबत संवाद साधण्यासाठी दाखल झाले. कार्यक्रमानंतर राहुल गांधी सभागृहातून बाहेर पडले आणि चुकून महिला स्वच्छतागृहात गेले.





महिला आणि पुरुषांसाठी उभारण्यात आलेल्या टॉयलेटबाहेर कोणतीही स्पष्ट खूण (साईन बोर्ड) नसल्याने हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे. महिलांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाबाहेर केवळ एक कागद चिकटवण्यात आला होता.


टॉयलेटच्या बाहेर गुजरातीमध्ये महिलांसाठी असं लिहिलं होतं. मात्र, राहुल गांधींचं त्याकडे लक्ष गेलं नाही आणि ते थेट महिलांच्या टॉयलेटमध्ये शिरले. गुजरातीत महिलांसाठी असे लिहिल्याने हा गोंधळ झाल्याचं म्हटलं जात आहे. राहुल गांधीना आपली चूक लक्षात आल्यानंतर ते तात्काळ टॉयलेटमधून बाहेर पडले.


राहुल गांधी यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते, एसपीजी कमांडो आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राहुल गांधी लेडीज टॉयलेटमध्ये गेल्याचं उपस्थित मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झालं.