नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंगापूर येथील एका कार्यक्रमातील विसंगतीवरून टीकास्त्र सोडले आहे. मोदींच्या कार्यक्रमातील प्रश्नोत्तरे ही आगोदरच ठरलेली असतात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. आपल्या आरोपांची पुष्टी करताना त्यांनी सिंगापूर येथे झालेल्या मोदींच्या कार्यक्रमाचा व्हिडिओही ट्विटरवर शेअर केला आहे. या कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नावर मोदींनी हिंदीतून दिलेले उत्तर आणि या उत्तराचे दुभाषकाने केलेले भाषांतर यात भलतीच तफावत आहे. हा व्हिडिओ सिंगापूर येथील एका विद्यापिठात गेल्या शुक्रवारी झालेल्या मोदींच्या एका कार्यक्रमाचा आहे.


पंतप्रधान मोदी वास्तव प्रश्न स्वीकारत नाहीत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, 'ते खरे प्रश्न स्वीकारत नाहीत. नाहीतर यांची गोची ही ठरलेलीच आहे.' खरे तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण लोक अत्यंत तल्लीन होऊन ऐकतात पण, सिंगापूर येथील या प्रकारामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात. दरम्यान, काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही या आधी मोदींच्या भाषणावर अनुवादकाकडून केल्या जाणाऱ्या लांबच लांब उत्तरवाचनाबाबत आश्चर्य व्यक्त करत टीका केली होती.



मोदी बोलले एक अनुवादकाने सांगितले भलतेच


दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी  यांन व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे की, या व्हिडिओत स्पष्ट दिसते की, पंतप्रधान अशियासमोर असलेल्या आव्हानांबाबतच्या विषयावर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर हिंदीत देतात आणि त्यानंतर अनुवादक एक संपूर्ण परिच्छेदच वाचून दाखवते. या अनुवादात काही आकड्यांचाही उल्लेख होतो. ज्याचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात केलाच नाही.