राहुल गांधींनी दिलेलं आश्वासन पूर्ण
काही दिवसांपूर्वी बॉक्सर विजेंदर सिंग यांनी खेळाबद्दल राहुल गांधींना प्रश्न एका कार्यक्रमात प्रश्न विचारले होते.
नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी बॉक्सर विजेंदर सिंग यांनी खेळाबद्दल राहुल गांधींना प्रश्न एका कार्यक्रमात प्रश्न विचारले होते. मी व्यायाम, रनिंग, स्विमिंग करतो तसंच आयकिडोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळाला आहे. मी खेळतो पण लोकांसमोर या गोष्टीबद्दल बोलत नसल्याचं राहुल गांधी म्हणाले.
माझ्या आयुष्यात खेळाचं महत्त्व होतं आणि राहणार आहे. दिवसातला एक तास मी खेळतो पण गेल्या तीन-चार महिन्यांपासून मला खेळायला वेळ मिळाला नसल्याचं वक्तव्य राहुल गांधींनी केलं.
आयकिडोचा व्हिडिओ शेअर करण्याची मागणी विजेंदरनं राहुल गांधींकडे केली होती. राहुल गांधींनी खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला तर अनेक जणांना प्रेरणा मिळेल, असं विजेंदर म्हणाला होता. यानंतर काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींचं सोशल नेटवर्किंग सांभाळणाऱ्या दिव्या स्पंदना या सोशल मीडिया विंगनं राहुल गांधींचे आयकिडो खेळतानाचे फोटो शेअर केले आहेत.