नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नव्या नावासह ट्विटरवर अवतरले आहेत. याआधी राहुल गांधी ऑफिस ऑफ आरजी (@OfficeOfRG) या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करत होते. पण आता त्यांनी या नावात बदल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी(@RahulGandhi)हे नाव त्यांनी आता त्यांच्या ट्विटर हॅण्डलला दिलं आहे. या नावामुळे राहुल गांधींना ट्विटरवर सर्च करणं सोपं जाईल. २०१५ साली राहुल गांधी ट्विटरवर आले होते.


सुरुवातीच्या काळात राहुल गांधी ट्विटरवर जास्त सक्रीय नव्हते. पण गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. सध्या राहुल गांधी यांचे ट्विटरवर ६२ लाख फॉलोअर्स आहेत. तर राहुल गांधी ९४ जणांना फॉलो करतात.