नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या अधिक आक्रमक झालेले दिसत आहेत. गुजरात निवडणुकीची जोरदार तयारी राहुल करत असून अनेक ठिकाणी भेट देत आहेत. दरम्यान ते ट्विटरवर अधिक सक्रीय झाल्याचेही गेल्या काही दिवसात पहायला मिळत आहे. यासाठी त्यांनी बॉट्सचा वापर करीत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. यामगचे गुपित राहुल यांनी सांगितले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल यांची वाढती लोकप्रियता हे विरोधकांसाठी डोकेदुखीचे कारण ठरली आहे. त्यामूळे त्यांच्या सोशल मीडिया सेल सबंधी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 
राहुल यांनी या टीकेला खूप गंमतीशीर आणि अनोख्या प्रकारे प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांनी रविवारी एक मजेशिर व्हिडिओ टि्वटरवर शेअर केला. यामध्ये राहुल यांचा पाळीव कुत्रा दिसत आहे. राहुल गांधी ज्याप्रमाणे त्याला करायला सांगत आहे तसे तो कुत्रा करत असल्याचे दिसून येते.


आपल्यावर आरोप करणाऱ्यांची यामाध्यमातून खिल्ली उडविली आहे. त्यात त्यांचा आवडता कुत्रा त्यांच्याऐवजी लिहितोय अशा पद्धतीने लिहत ते म्हणतात, 'लोक विचारत असतात की या माणसासाठी टि्वट कोण करतं. पाहा मी, पीडी, करतो. 'टि्वट'साठी उप्स 'ट्रीट'साठी पाहा मी काय करतो.'


हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.