`राहुल गांधींनी नीट गृहपाठ करावा`
केंद्रीय कायदा मंत्री, रवी शंकर प्रसाद यांनी राहुल गांधींची उडवलीय.
अहमदाबाद : केंद्रीय कायदा मंत्री, रवी शंकर प्रसाद यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवलीय.
जगभरात जीएसटीचं कौतुक
सगळं जग जीएसटीचं कौतुक करत असताना, राहुल मात्र त्याचा उल्लेख गब्बर सिंग टॅक्स असा करतायेत. राहुल गांधींनी आणि त्यांची भाषणं लिहिणाऱ्यांनी नीट गृहपाठ केला पाहीजे, असं रवी शंकर प्रसाद म्हणाले.
काँग्रेसमध्ये घराणेशाही
काँग्रेसमध्ये घराणेशाही आहे त्याउलट भाजप मात्र लोकशाही पक्ष आहे. इथं आम्ही सर्व एकजूटीने पक्षासाठी काम करतो. काँग्रेसकडे बघा तिथे राहुल गांधीशिवाय दुसरं कोणीही दिसत नाही. राहुल गांधींनी मणीपूर, हरयाणा, महाराष्ट्र, झारखंड, आसाम सगळीकडे प्रचार केला. त्याचा परिणाम झाला हे बघण्यासारखं आहे.
मोदींच्या काळात विकास
गुजराती माणसाचा अभिमान आहे. ते फार कष्टाळू आहेत. 22 वर्षांच्या भाजपच्या कार्यकाळात व्यापारी आणि उद्योगपतींना हे कळून चुकलं आहे की भाजप शासन त्यांच्या हिताचं आहे. मोदींच्या काळात भ्रष्टाचाराचं एकही प्रकरण झालं नाही. या प्रकारचं नेतृत्व राहुल देऊ शकत नाही, असं रवी शंकर प्रसाद म्हणाले.