नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शनिवारी गोरखपूरमध्ये दाखल झाले. बीआरडी हॉस्पीटलमध्ये ऑक्सिजनअभावी मृत्युमुखी पडलेल्या चिमुरड्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी गोरखपूरमध्ये म्हणजेच मुख्यमंत्री योगींच्या बालेकिल्ल्यात पोहचलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी आल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांना आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी कुणी आपल्या शरीरावर टॅटू गोंदवला तर कुणी राहुलचा फोटो असलेलं टी-शर्ट परिधान केलं. एकानं तर आपल्या छातीवर राहुल गांधी यांचा फोटोच गोंदवून घेतला.


११ ऑगस्ट रोजी बीआरडी हॉस्पीटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडल्यानं प्राणवायूअभावी ७० चिमुरड्यांचा मृत्यू झाला होता.