काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधींनी बोलावली पहिली बैठक
राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिली बैठक बोलावली आहे. राहुल गांधी यांच्या घरी ही बैठक बोलावण्यात आली आहे.
नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिली बैठक बोलावली आहे. राहुल गांधी यांच्या घरी ही बैठक बोलावण्यात आली आहे.
काँग्रेसची कमान १९ वर्ष सांभाळल्यानंतर सोनिया गांधी यांनी शनिवारी काँग्रेसचं अध्यक्षपद राहुल गांधी यांच्याकडे सोपवलं.
४७ वर्षीय राहुल गांधी यांनी शनिवार काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. काँग्रेस प्रेसिडेंट इलेक्शनचे रिटर्निंग अधिकारी मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी त्यांना अध्यक्षपदाचं प्रमाणपत्र दिलं.
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरची अनेक वर्षे भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं सांभाळणे हा तसा काटेरी मुकूटच आहे. राहुल गांधी तो कसा सांभाळतील याबाबत काँग्रेसच नव्हे तर, देशासह जगभरातील राजकीय जाणकारांना उत्सुकता आहे.