चोटिला (गुजरात) : कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना हरवलेला राजकीय सूर सापडल्याने कॉंग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. नुकतेच त्यांनी एका मंदिरात न थांबता अवघ्या १५ मिनीटांत १ हजार पायऱ्या चढल्या आणि आपण किती तंदूरुस्त आहोत हेही दाखवून दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. आगामी काळात गुजरातमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मोर्चेबांधनी करण्यास सुरूवात केली आहे. या दौऱ्यात त्यांनी बुधवारी सुरेंद्रनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध चोटिला मंदिराला भेट दिली. या भेटीवेळी त्यांनी मंदिराच्या १ हजार पायऱ्या अवघ्या १५ मिनीटात एका दमात चढल्या आणि मंदिर प्रवेश केला. राहुल यांनी चोटिला मंदिरात पूजा-अर्चा केली. राहुल गांधींचा हा उत्साह आणि फिटनेस पाऊन कॉंग्रेस नेत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.


राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वीच सौराष्ट्र येथील प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरात दर्शन घेऊन गुजारत दौऱ्याला प्रारंभ केला होता. पटेल समुदायाला आकर्षीत करण्यासाठी राहुल गांधी कागवाड जिल्ह्यातील खोडल धाम मंदिरालाही भेट देणार आहेत.