Rahul Gandhi: टीम इंडियाने वर्ल्ड कप हारल्यानंतर संपूर्ण देशातील क्रिडाप्रेमींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. टीम इंडियाच्या पटापट विकेट्स पडल्या तसेच बॉलर्सनाही चमकदार कामगिरी करता आली नाही, अशी हरण्याची अनेक कारणे सांगितली जात आहे. सोशल मीडियात यूजर्स अनेकजण कोणत्या ना कोणत्या खेळाडूला जबाबदार धरत आहेत. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात विधान केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी निवडणूक प्रचारासाठी राजस्थानमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी यावेळी  ते जालोर येथे एका निवडणूक सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी विश्वचषकातील भारतीय संघाच्या पराभवाचा उल्लेख केला. आमच्या मुलांनी वर्ल्ड कप जिंकला असता पण पनौतीमुळे त्यांना हरले, असे विधान त्यांनी केले. 




'पनवतीमुळे सामना हरला'


कॉंग्रेसच्या ट्विटर हॅंडलवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. यामध्ये राहुल गांधी भाषण करत असताना स्टेजखालून लोकांनी पनौती-पनौती अशी घोषणाबाजी सुरू केली. यावर राहुल गांधी यांनी कोणाचेही नाव न घेता म्हटले की, 'आमची पोरं तिथे वर्ल्ड कप जिंकू शकली असती, पण पनौतीमुळे आम्हाला हरवलं. टीव्हीवाले हे तुम्हाला सांगणार नाहीत, पण जनतेला माहीत आहे', असे राहुल गांधी म्हणाले.  


भारताचं स्वप्न भंगल


आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता ठरला आहे. 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर  खेळवण्यात आलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा विकेट राखून पराभव केला. या विजयबरोबर ऑस्ट्रेलियाने तब्बल सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 241 धावांचं आव्हान दिलं होतं. ट्रॅव्हिस हेडच्या 137 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 43 षटकात पार केलं. स्पर्धेत सलग दहा सामने जिंकणाऱ्या टीम इंडियाला अंतिम सामन्यात मात्र पराभव पत्करावा लागला आणि तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्याचं स्वप्न भंगलं.