नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली. राहुल गांधी यांनी संसदेत त्यांच्या जागेवर जाऊन नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली. नरेंद्र मोदी यांची संसदेत भेट घेण्याआधी राहुल गांधी यांनी आपल्यावर भाजपकडून होत असलेले आरोप सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


राहुल गांधी नरेंद्र मोदी यांची गळा भेट घेण्याआधी म्हणाले, मला कुणी पप्पू म्हणा, शिव्या द्या, माझ्याबद्दल तुमच्या मनात तिरस्कार आहे, पण माझ्या मनात तुमच्याबद्दल तसूभरही तिरस्कार नाही. एवढं सांगून राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्या जागेवर जाऊन नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली आणि सर्व खासदार अवा्क झाले.