दिल्ली : सध्या गुजरात विधानसभा निवडणूकांसाठी अहमदाबादमध्ये असणारे राहुल गांधी शनिवारी दिल्लीला परतले आणि परत काही वेळातच पुन्हा अहमदाबादमध्येही आले.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लवकरच कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची अधिकृतरित्या जबाबदारी सांभाळण्यासाठी सज्ज होणारे राहुल गांधी केवळ आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीला आले होते.  


 अहमदाबाद  दिल्ली प्रवास 


 
 शनिवारी सकाळी इंडिगो विमानाने अहमदाबाद ते दिल्ली असा विमानप्रवास  त्यांनी इंडिगो या विमान कंपनीने केला. 
 
 इंडिगोच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून राहुल गांधींच्या विमानप्रवासाची माहिती आणि शुभेच्छा देण्यात आल्या. 
   



 इंडिगो झाला ट्रोल 
 


 काही दिवसांपूर्वी इंडिगोच्या क्रु मेंबर्सचे उद्दामपणाचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत होते. त्याचा दाखला देत अनेकांनी इंडिगोला लक्ष्य केले होते.  


 



 



 
 सोनिया गांधीचा वाढदिवस  


 
 सोनिया गांधीचा शनिवारी 71 वा वाढदिवस होता. त्यानिमित्त गुजरात विधानसभा निवडणूकीच्या कामातून वेळ काढून राहुल गांधी स्वतः त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीला पोहचले.  
 पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील सोनिया गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.