न्यूयॉर्क: अमेरिकेच्या दौर्यावर गेलेले कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे विविध ठिकाणांना भेट देत आहेत. दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्री नाथिलिया रामोस हिच्या सोबतचा त्यांचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. सहा दिवसांपूर्वी तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन राहुल गांधींसोबतचा फोटो शेअर केला होता. पण आता हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेच्या दौर्यावर असलेले राहुल गांधी सार्वजनिक कार्यक्रमांत कुर्ता-पायजामात लोकांना भेटत आहेत. पण या अभिनेत्रीसोबतच्या फोटोत ते कोट घातलेले दिसून येत आहेत. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात त्यांची भेट झाली असावी असे म्हटले जात आहे.
पण हा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्या अभिनेत्रीबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
दोघांनीही पोज देऊन हा फोटो काढला असावा किंवा त्या अभिनेत्रीने भारताच्या एक बड्या नेत्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली असावी असे म्हटले जात आहे.



अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटमध्ये फोटो शेअर करत राहुल यांच्या नावाचा उल्लेख न करत तिने त्यांची प्रतिभावंत विचारवंतांशी तुलना केली आहे.  नथालिया रामोस यांनी असे लिहिले आहे की जगातील विविध भागांतील प्रतिभावान विचारवंतांना ऐकण्याची- भेटण्याची संधी मिळाल्याने मी आनंदी आहे.


कोण आहे नाथिलिआ रामोस?


नथालिया रामोस ही एक अमेरिकन अभिनेत्री आहे. २००५ पासून ती एंटरटेन्मेंट फिल्डमध्ये आहे.  पण २००७ मध्ये ब्रेट्ज सिनेमात ती प्रभावीपणे दिसून आल.  तिने टेलिव्हिजन मालिका देखील केल्या आहेत. तिचा जन्म ३ जुलै १९९२ ला स्पेनच्या मॅड्रीड येथे झाला. तिची आई मूळची ऑस्ट्रेलियाची असून वडिल स्पेन्सचे आहेत. तिचे वडील हुआन कार्लोस स्पेनचे लोकप्रिय पॉप गायक आहेत.