राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना यात टाकले मागे
काँग्रेसमुक्त भारत असा प्रचार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींना सोशल मीडियावर मागे टाकलेय. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही मात केलेय.
मुंबई : काँग्रेसमुक्त भारत असा प्रचार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींना सोशल मीडियावर मागे टाकलेय. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही मात केलेय.
सप्टेंबर महिन्यात राहुल गांधी यांचं ट्विट सरासरी २,७८४ वेळा रिट्विट करण्यात आले आहे तर मोदी यांचे ट्विट सरासरी २५०६ जणांनी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे ट्विट १७२२ जणांनी रिट्विट केले आहे.
भाजपने सोशल मीडियाचा जोरदार वापर करत गेल्या निवडणुकीत त्याचा चांगलाच प्रत्यय आला. मात्र, काँग्रेस त्याप्रमाणे कोठेच दिसत नव्हती. आता राहुल गांधी हे सोशल मीडियाचा अंदाज पाहून अधिक सक्रीय झालेत. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार गेल्या तीन वर्षातील राजकीय नेत्यांच्या ट्विटचा विचार करता राहुल गांधींच्या ट्विटला सर्वाधिक लोकांनी रिट्विट केलं आहे.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी, केजरीवाल यांना मागे टाकले आहे. मोदी यांचे ट्विटरवर सर्वाधिक ३५ मिलियन फॉलोअर्स आहे. त्यानंतर केजरीवाल यांचे १२ मिलियन फॉलोअर्स आहेत. हिंदुस्थान टाइम्सच्या रिपोर्टनुसार जुलै ते सप्टेंबर दरम्यान राहुल गांधींना १० लाख पेक्षा जास्त लोकांनी फॉलो केलेय.
ऑक्टोबरमध्ये राहुल गांधींच्या ट्विटर अकाऊंटवरून नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबधीत ट्विट करण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यात राहुल गांधी यांचं ट्विट सरासरी २,७८४ वेळा रिट्विट करण्यात आले. तर मोदी यांचे ट्विट सरासरी २५०६ जणांनी आणि केजरीवाल यांचं ट्विट १७२२ जणांनी रिट्विट केलं आहे.
ऑक्टोबर महिन्यात राहुल गांधी यांचे ट्विट सरासरी ४ हजार वेळा रिट्विट करण्यात आले. त्यामुळे मोदींपेक्षा राहुलची टिवट्वि लोकांना पसंत पडल्याचे चित्र सोशल मीडियावर दिसत आहे.