बलिया : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणूक 2019 मध्ये प्रचारा सभांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर सातत्याने निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री योगी हे घोसी लोकसभा जागेतील भाजपा उमेदवार हरिनारायणा राजभर यांच्या समर्थनाथ प्रचार करण्यासाठी रसडा पोहोचले होते. यावेळी त्यांनी अगस्ता वेस्टलॅंड घोटाळ्यात राहुल गांधींना पळकुटा असे म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेलिकॉप्टर घोटाळ्यात काँग्रेसने दलाली केली आणि यानंतर राहुल इटलीला पळाले. देशात संकट येते तेव्हा ते इटलीला पळतात. म्हणूनच क्रिस्टियन मिशेल देखील इटलीला पळाला होता. पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसच्या या मामाला इटलीतून आणून बंद केले आहे. मामाचा भाचा देखील तुरुंगात जाऊ नये अशी भीती त्यांना वाटत असल्याचे योगी म्हणाले. एवढे बोलुनच ते थांबले नाहीत. तर त्यांनी क्रिस्टियन मिशेल यांची तुलना महाभारतातील शकूनीशी केली आहे. राहुल गांधी यांचा दुर्योधन तर रॉबर्ट वाड्रा यांचा दु:शासन म्हणून त्यांनी उल्लेख केला.


तुरुंगात जाण्याची भीती 



अगस्ता वेस्टलॅंड हेलीकॉप्टर घोटाळा प्रकरणी तुरूंगात जाण्याची भीती राहुल गांधी यांना वाटत आहे. काँग्रेस मोदींना घाबरली आहे. कारण पंतप्रधान मोदींनी मामाला इटलीतून आणून तुरूंगात डांबले आहे. भाच्याला देखील ती भीती वाटत आहे.